श्रेयसला चौथ्या क्रंमाकावर खेळण्याची संधी द्यावी – कुंबळे

नवी दिल्ली : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला रविवारपासून सुरूवात होत आहे. दुखापतीमुळे काही फलंदाज संघाबाहेर असल्याने नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विंडीजविरूध्दच्या आगामी एकदिवसीय मालिकेत श्रेय्यस अय्यरला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जावी, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केलं आहे.

कुंबळे पुढे बोलताना म्हणाले, ” दुखापतीमुळे शिखर धवनला या मालिकेस मुकावे लागले आहे. त्यामुळे लोकेश राहुल सलामीवीराच्या भूमिकेत असेल. आपण श्रेयस अय्यरची गुणवत्ता पाहिलेली आहे. त्याची दिवसेदिवस प्रगती होत आहे. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवावे.”

दरम्यान, टी-२० मालिका आटोपल्यानंतर रविवारपासून भारत-वेस्चइंडिज याच्यांत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना १५ डिसेंबरला चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. दुसरा सामना १८ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे तर तिसरा सामना २२ डिसेंबरला कटक येथे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.