नवी दिल्ली : देशातील करोनासंबंधी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसामध्ये वाढलेल्या करोना बाधितांच्या संख्येत आज किंचितशी घट पाहायला मिळत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे.
रविवारी दिवसभरात देशात 16 हजार 464 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/5dbWa0mtFe pic.twitter.com/ZI6hTSEQKZ
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 1, 2022
देशात सध्या एक लाख 43 हजार 989 सक्रिय करोना रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत 39 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 26 हजार 396 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहेत. रविवारी 16 हजार 112 रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत.