लंडन : सध्या थंडीतापाचे विषाणू करोनाच्या साथीला कारणीभूत असणाऱ्या सार्स-कोव्ह-2 विषाणूवर मानवी शरीरात मात करू शकतात, असे ग्लासगो विद्यापीठातील संशोधनात आढळून आले आहे.
थंडीतापाला रिनहो विषाणू कारणीभूत असतात. ते करोनाच्या विषाणूंचा पाडाव करतात. मात्र, रिनहो विषाणू करोनाविषाणूंच्या संसर्गापासून दीर्घकाळ संरक्षण देत नाहीत. सामान्य थंडीताप ओसरला की या विषाणूच्या संसर्गामुळे निमार्ण झालेली रोगप्रतिकार शक्ती लोप पावते. त्यानंतर सार्स-कोव्ह-2 च्या विषाणूंचा संसर्ग होतो. या माहितीचा वापर करोना प्रतिकारविषयक धोरणात करण्यात आला.
या दरम्यानच्या काळात केलेले लसीकरण उपयुक्त ठरू शकते, असे ग्लासगो विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या अभ्यासात 2009 मध्ये आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथी ला विलंबित करण्यात आणि संपवण्यात रिनहो विषाणूंनी मदत केली असल्याचे आढळून आले.