पोस्टल मतदानाविना उमेदवारांना पडलेली मते
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना 80 हजार 494 मते तर अनिल राठोड यांना एकूण 69 हजार 554 मते पडली. श्रीपाद छिंदम यांना 2 हजार 907, बहिरनाथ वाकळे- 1 हजार 39, संतोष वाकळे-993, आसौफ सुलतान-6 हजार 852, किरण काळे-2 हजार 850, श्रीधर दरेकर-272, प्रतिक बारसे-220, सचिन राठोड-167, सुनिल फुलसौंदर-138, संदीप सकट-661, तर नोटा-2 हजार 705.
नगर – नगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचा पराभव करून 11 हजार 139 मतांनी पराभव करून विधानसभेचा पुन्हा विजयाचा गुलाल घेतला आहे. याबाबत संग्राम जगताप यांना अधिकृत प्रमाण पत्र निवडणुक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातवरण पसरले शहरात जल्लोश करण्यात आला.
गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. त्यावेळी पहिल्या फेरीपासूनच जगताप हे दहाव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. सहाशे मतांपासून सुरू झालेली त्यांची आघाडी दहा हजारापर्यंत पोहोचली होती. मात्र, शहरातील मतमोजणी सुरू झाली त्यावेळी 10 ते 15 फेरीपर्यंत जगताप यांच्या आघाडी तब्बल चार हजार 900 मतांनी घटली होती. मात्र सारसनगर, केडगाव, रेल्वे स्टेशन रोड भागात जगताप यांना निर्णायक मताधिक्य मिळाले. जगताप यांना 11 हजार 139 मतांची आघाडी मिळाली आहे. ही आकडेवारी पोस्टल मतदानासहीत आहे.
नगर शहरात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या विरुद्ध जगताप हे दुसऱ्यांदा लढत झाली. मात्र राठोड यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. जगताप यांनी केलेली मोर्चेबांधणी, प्रचारासाठी घेतलेली मेहनत आणि तरुणांमध्ये केलेला संपर्क यामुळे जगताप हे विजयापर्यंत पोहोचले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या जमाव बंदिचे आदेश असतांनाही राष्ट्रवादी कार्यकर्ते व महिलांनी ढोल, ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत, फटाके फोडून आनंद व्यक्त केला. परंतु काही वेळातच कॉटेज कॉर्नवर पोलिसांनी येऊन कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिसा बजावल्या. यामध्ये जमावबंदीचे आदेश होते. त्यामुळे सर्वांनी तेथून काढता पाय घेतलाय.