काठमांडू – चीनने हेरगिरीसाठी अवकाशात सोडलेलेल्या उपग्रहाचे रॉकेट नेपाळच्या अवकाशात जळून खाक झाले आहे. “युनायटेड स्टेटस नेव्हल इन्स्टिट्युट’ने ही माहिती दिली आहे. अशाच प्रकारची घटना गेल्या आठवड्यात टेक्सासच्या अवकाशातदेखील घडली होती.
चीनने “द चॅंग झ्यांग 2 डी’ नावाचे रॉकेट अवकाशात सोडले होते. सुमारे 200 दिवस अवकाशात राहिल्यानंतर हे रॉकेट पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेमध्ये परत आले होते. वातावरणीय घर्षणामुळे हे रॉकेट नेपाळच्या अवकाशात असताना जळून खाक झाले, असे खगोल संशोधक जोनाथन मॅक्डोल्वेल यांनी म्हटले आहे. “इपार्डाफास’ नावाच्या गुन्हेविषयक वृत्तांच्या सत्यतेचा शोध घेणाऱ्या संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे.
हे 4 टन वजनाचे रॉकेट “चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’च्या “वाय-65′ मिशन अंतर्गत अवकाशात सोडण्यात आले होते. 29 जुलै रोजी या रॉकेटच्या माध्यमातून हेरगिरीचे 3 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते. मध्य चीनमधील शिचॅंग सॅटेलाईट लॉंच सेंटरमधून हे रॉकेट सोडण्यात आले होते.
Influenza H3N2 : देशात इन्फ्लूएंझा ‘एच3एन2’चा धोका वाढला; सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात…
नेपाळच्या पश्चिमेकडील अवकाशात हे रॉकेट जळून खाक झाले, असे मॅक्डोल्वेल यांनी म्हटले आहे. हे रॉकेट या वर्षभरात कोंव्हातरी वातावरणाच्या कक्षेमध्ये परत येणे अपेक्षित होते. अशाच प्रकारे चीनचे रॉकेट टेक्सासच्या अवकाशात असताना गेल्या आठवड्यात जळून खाक झाले होते.