सेऊल – उत्तर कोरियाने आपल्या एका सरकारी अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या केली आणि त्याला पेटवून दिल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला आहे.
हा अधिकारी बेकायदेशीर मासेमारीच्या तपासासाठी दोन्ही देशांदरम्यानच्या सागरी हद्दीजवळ सरकारी जहाजावर होता. मात्र समुद्रात उतरलेला असताना सागरी हद्दीचा भंग केल्याच्या आरोपावरून उत्तर कोरियाच्या नौदलाने त्याच्यावर गोळीबार केला.
त्याच्या शरीरावर द्रवरूप गॅस ओतून पेटवून देण्यात आले, असे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
हा अधिकारी उत्तर कोरियाच्या सागरी हद्दीत कसा पोचला हे समजू शकलेले नाही. मात्र करोनाच्या पार्श्वभुमीवर लागू असलेल्या नियमानुसार बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्यास गोळी घालण्याचे नियम उत्तर कोरियात लागू असल्यानेच या अधिकाऱ्याला मारण्यात आले असावे, असा अंदाज आहे.