बीजिंग – अफगाणिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा काळजी घ्यावी, असे आवाहन चीनचे परराष्ट्र मंत्री किन गेंग यांनी तालिबानी हंगामी परराष्ट्र मंत्री आणिर खान मुत्तगीला केले आहे. मुत्तगीला फोन करून किंग गेंग यांनी हे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमधील चिनी नागरिकांच्या आणि चीनच्या संस्थांच्या सुरक्षेला चीनकडून सर्वाधिक महत्व दिले जाते आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी तालिबानकडून योग्य काळजी घेतली जावी अशी अपेक्षा किंग गेंग यांनी यावेळी व्यक्त केली.
Pakistan : ‘एसकेएमटी’ला दिलेले पैसे गृह प्रकल्पात गुंतवले – इम्रान खान
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देसाविरोधातल्या कारवाईसाठी केला जाणार नाही, याची काळजी तालिबान घेत आहे. ज्या कारवायांचा परिणाम चीन आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीपूर्ण संबंधावर होईल, अशा कोणत्याही कारवायांना रोखले जाईल, अशी हमी मुत्तगी यानेही चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना दिली आहे.
US : रशियाचा वॅगनर ग्रुप अमेरिकेकडून गुन्हेगारी संघटना घोषित
उत्तर अफगाणिस्तानमध्ये अमू दरया कोऱ्यातील तेल उत्खननाच्या प्रकल्पासाठी तालिबानने चिनी कंपनीकबरोबर करार केला आहे. 500 दशलक्ष डॉलरच्या या प्रकल्पासाठीच्या करारावर 5 जानेवारीला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी मोठ्या संख्येने चिनी कर्मचारी अफगाणिस्तानात येणार आहेत.
अफगाणिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात इसिस-के या दहशतवादी संघटनेने काबूलमधील एका हॉटेलवर हल्ला केला होता. हे हॉटेल चिनी नागरिकांमध्ये प्रसिद्ध आहे. अशा घटनामुळे अफगाणिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चीनला धास्ता वाटू लागली आहे.