इस्लामाबाद – शौकत खानून मेमोरियल ट्रस्टला दिलेल्या देणगीचे पैसे एका खासगी गृह प्रकल्पामध्ये गुंतवण्यात आल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज दिली. या ट्रस्टला दिलेल्या देणगीचा 3 दशलक्ष डॉलरचा निधी खासगी गृहनिर्माण प्रकल्पामध्ये गुंतवण्यात येत असल्याबद्दल “एसकेएमटी’च्या संचालकांनी आपल्याला कळवले होते, असे इम्रान खान म्हणाले. मात्र हा निधी नंतर या ट्रस्टला परत करण्यात आल्याचे स्पष्टिकरण देखील त्यांनी नंतर दिले असल्याचे वृत्त पाकिस्तानातील एका दैनिकाने दिले आहे.
शौकत खानून मेरिरियल ट्रस्टची स्थापना पाकिस्तानातील सेवाबावी संस्थांच्या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. पाकिस्तानचे विद्यमान संरक्षण मंत्री आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते ख्वाजा आसिफ यांच्यावर इम्रान खान यांनी 10 अब्ज रुपयांच्या बदनामीचा खटला दाखल केला आहे.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान इम्रान खान यांनी देणगीचे पैसे न्यत्र गुंतवल्याची माहिती दिली. मात्र हे पैसे कोणत्या गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवण्यात आले होते, ते आपल्याला आठवत नसल्याचे इम्रान उलट तपासणीच्यावेळी म्हणाले.
US : रशियाचा वॅगनर ग्रुप अमेरिकेकडून गुन्हेगारी संघटना घोषित
डॉलरच्या दरानुसार परतफेड नाही…
हे पैसे नंतर ट्रस्टला परत करण्यात आले आणि हे प्रकरण मिटवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र पैसे गुंतवण्यात आले तेंव्हा डॉलरचा दर 60 रुपये होता. जेंव्हा गुंतवणूक मॅच्युअर झाली तेंव्हा डॉलरचा दर 120 रुपये इतका दुप्पट झाला होता, असे ख्वाजा आसिफ यांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले.
त्यावर जर विश्वास दाखवला गेला तर हे प्रकरण आपण मिटवू, अशी हमी इम्रान खान यांनी न्यायालयाला दिली. ट्रस्टच्या निधीचा गैरवापर आणि मनी लॉन्डरिंगचा आरोप ख्वाजा आसिफ यांनी इम्रान खान यांच्यावर केला होता. त्वावरून इम्रान यांनी 10 अब्ज रुपयांचा बदनामीचा दावा त्यांच्यावर ठोकला आहे.