वॉशिंग्टन – रशियातील वॅगनर ग्रुप या मोठ्या उद्योग समुहाला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून घोषित केले आहे. रशियाच्या उद्योगांवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. यामुळे रशियाच्या उद्योगविश्वार मोठे नियंत्रण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वॅगनर ग्रुपकडून रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचा निकटवर्तीय असलेल्या येवगेनी प्रिगोझिन यांच्याकडून नियंत्रण केला जातो. म्हणून वॅगनर ग्रुपला गुन्हेगारी संघटना घोषित करण्यात आल्याचे व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वॅगनर ग्रुपच्या माध्यमातून रशियाच्या सैन्यदलामध्ये 50 हजार सैनिकांची भरती केली गेली आहे. याशिवाय युक्रेनविरोधात लढण्यासाठी उत्तर कोरियाकडून वॅगनर ग्रुपला शस्त्रे पुरवली जात असतात.
Israel : पंतप्रधान नेत्यान्याहूंनी केली मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्याची हकालपट्टी
याचे गुप्तचरांनी उपलब्ध करून दिलेले फोटो किर्बे यांनी पत्रकार परिषदेत उपलब्ध केले. वॅगनर ग्रुपला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना ठरवण्यासाठी अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने यापूर्वीच हालचाली सुरू केल्याचेही किर्बे यांनी सांगितले.