“मुंबई चाले भाजपासोबत”…प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा मॉर्निग वॉक

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष प्रचारासाठी नवनवीन युक्‍ता आखत आहे. जेणेकरून आपल्या मतदारांपर्यंत पोहचता येईल. असाच प्रयत्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आज सकाळी भाजपकडून मुंबई चाले भाजपसोबत…हे अभियान राबवले. या अभियानातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांसह मरिन ड्राईव्हवर मॉर्निग वॉक केला.

मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मरिन ड्राईव्हवर आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मॉर्निग वॉक केला. यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा मतदारासंघाचे उमेदवार राहुल नार्वेकरदेखील उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मरिन ड्राईव्ह वर तर मुंबईतील अन्य भागात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील मॉर्निग वॉक करत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी वांद्रे पश्‍चिममध्ये मॉर्निग वॉक करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी चारकोप भागात तर कांदीवली पुर्व मतदारसंघात अजय भातखळकर यांनी मॉर्निंगवॉक केला आणि जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचा शेवटचा रविवार असल्याने प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान, आज प्रचारासाठी पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.