Chhatrapati Sambhaji Nagar VideoViral । डॉक्टर पेशाला काळीमा फासणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन ग्रामीण शासकीय रुग्णालयातील आहे. धक्कादायक म्हणजे व्हिडिओत अंगावर एकही कपडा नसलेला हा डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. मिळलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर औषधांचा नशा करतो आणि नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar VideoViral । व्हायरल व्हिडिओतील नेमकी घटना काय
पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकीन ग्रामीण शासकीय रुग्णालयातील ४५ वर्षीय डॉक्टर हे अंमली पदार्थांचे म्हणजे प्रामुख्याने अनेक औषधांची नश करत होता. तो नशेत असताना कपड्यांशिवाय हॉस्पिटलमध्ये फिरताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ लीक होताच व्हायरल झाला.
Chhatrapati Sambhaji Nagar VideoViral । ग्रामस्थ संतापले
यापूर्वीही बिडकीन शासकीय रुग्णालय चर्चेत आले आहे. अनेकदा या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडून वेळेवर उपचार मिळत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नाही, आणि गैरहजर असतात अशाही घटना समोर आल्या आहे. अनेक डॉक्टर अपडाऊन करत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत असल्याचा देखील आरोप केला जातो. असे असतानाच याच रुग्णालयातील एका डॉक्टरांचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
#Horoscope 10 March 2024 : आजचे भविष्य ( 10 मार्च 2024 )