Chhatrapati Sambhaji Nagar Loksabha Election| वंचित बहुजन आघाडीकडून मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यात पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अफसर खान यांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले अफसर खान यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केला आणि रात्री त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये उमेदवार देतांना जलील यांच्या मुस्लीम मतांचा विचार करता शहरातील मुस्लीम नेत्याला संधी दिली आहे.
विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि इम्तियाज जलील यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवले असल्याची चर्चा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होती.
मात्र, एमआयएमने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघांत वंचितला साथ दिली नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जलील यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अफसर खान यांना रिंगणात उतरवले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये उमेदवार देतांना जलील यांच्या मुस्लीम मतांचा विचार करता शहरातील मुस्लीम नेत्याला संधी दिली आहे.
कोण आहेत अफसर खान ? Chhatrapati Sambhaji Nagar Loksabha Election|
महापालिकेच्या राजकारणात सक्रीय असलेले अफसर खान हे काँग्रेसकडून महापलिकचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. शहरातील बेगमपुरासह मुस्लिम बहूल वार्डामध्ये त्यांचे वर्चस्व आहे. शहर आणि जिल्ह्यातही त्यांचा संपर्क असल्याने वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांना उमेदवारी दिली असल्याचे म्हटले जात आहे.
वंचितकडून तीन मुस्लिम उमेदवार मैदानात Chhatrapati Sambhaji Nagar Loksabha Election|
वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत एकुण 24 उमेदवारांची घोषणा केली आहे. यात तीन मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये धुळ्यातून अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली आहे. अब्दुल रहमान हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रातील भाजप सरकारच्या सीएए कायद्याविरोधात त्यांनी राजीनामा देऊन निषेध केला होता. तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पक्षाने अबुल हसन खान यांना उमेदवारी दिली आहे. वंचितच्या तिसऱ्या यादीत अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, स्वतंत्र लढत असले तरीही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्याने त्यांनी देखील प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा:
एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार ? ; राजकीय पुनर्वसनासाठी करणार पक्षप्रवेश ?