छगन भुजबळ पार्थ पवार यांना म्हणतात, “नया है वह”!

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांच आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पार्थ पवार यांविषयी वक्‍तव्य केले आहे. त्यांनी पार्थ यांचयाविषयी बोलताना ‘नया है वह’ असे म्हटले आहे. तसेच अजित पवार नाराज नसल्याचेही भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवार कुटुंबात सगळं काही आलबेल असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी फटकारले होते. “पार्थ पवार यांचे वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही “, असे शरद पवार म्हणाले होते.

याविषयी आज छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी सांगितले त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचे झाले तर ‘नया है वह’. तसेच पवार कुटुंबात वाद नसल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, “पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत. अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सगळे एकत्रित आहोत. कुटुंबात एकमेकांना सुचवू शकतात.” दरम्यान, आता शरद पवार आणि पार्थ पवार यांच्याविषयीच्या प्रकरणात आता आणखी कोणती राजकीय प्रतिक्रिया येणे पाहणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.