मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून युट्युबमध्ये मराठी भाषेत चर्चेचा विषय असलेल्या व्यक्ती म्हणजे, ‘विनय माळी’. आपल्या आगरी भाषेतील कॉमेडीमुळे विनायक महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांच्या मनात राज्य करतो. खूप कमी लोक असतील ज्यांना विनायक माळी हे नाव परिचयाचे नसेल.
मात्र, विनायक बद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. आगरी कॉमेडीअन विनायक माळीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः विनायकने सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये विनायकने कोरोना चाचणीचा रिपोर्टही पोस्ट केला आहे, त्यानुसार 28 वर्षीय विनायकची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.
https://www.facebook.com/vinayakmaliyoutuber/posts/193675375448913
यूट्यूबवर फार कमी मराठी विनोदी वाहिन्या आहेत, ज्याद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होते. त्यातीलच एक विनायक माळीचे चॅनेल आहे. मुख्यत्वे आगरी भाषेत विनायकचे व्हिडिओ हे असतात आणि त्याचे हे व्हिडिओ प्रेक्षकांना प्रचंड आवडत. यूट्यूबवर सध्या विनायकचे 1.18 मिलिअन सबस्क्रायबर्स आहेत.
https://www.facebook.com/vinayakmaliyoutuber/posts/192336092249508