शिवाजीनगर-खडकी मार्गावर आजपासून वाहतुकीत बदल; वाचा पर्यायी मार्ग

हॅरिस पुलाजवळ उभे राहतेय मेट्रो स्टेशन

पुणे  – खडकी परिसरात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर मेट्रोच्या खडकी स्टेशनचे काम सुरू आहे. या अनुषंगाने खडकी वाहतूक विभागांतर्गत येत्या शुक्रवारपासून (4 डिसेंबर) वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात येणार आहे. दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बदल होणार नसून, ही वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.

 

 

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर हॅरिस ब्रिज ते सीएएफडी या दरम्यान महामेट्रोचे खडकी स्टेशन तयार करण्यात येणार आहे. यासाठी खडकी वाहतूक विभागांतर्गत 4 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले आहेत.

 

 

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोपोडी चौकातून पुणे शहराकडे जाणाऱ्या दुचाकी, कार, रिक्षा, टेम्पो आदी हलक्या वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. हलकी वाहने खडकी रेल्वे स्टेशन येथील स्टार हॉटेल समोरुन वळवून महात्मा गांधी रस्त्याने खडकी बाजार गणपती मंदिर येथून उजवीकडे वळून एमएसईबी आणि बिझनेस सेंटर या दोन ठिकाणांहून उजवीकडे वळून सप्लाय डेपो समोरुन सीएएफडी सर्कल येथून चर्च चौकाकडे (संविधान चौकाकडे) जातील.

 

 

पीएमपी बसेस, एसटी बसेस, ट्रक आदी अवजड वाहनांना जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने सरळ चर्च चौकाकडे जाता येणार आहे. तर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.