पुणे – भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन चालू आहे. यावेळी गिरीश बापट, मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत मोकाटे यांसाच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या बहुतांश जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. अर्ज दाखल करण्याला दोनच दिवस शिल्लक असल्याने बहुतेक उमेदवारांनी गुरुवारचा दिवस यासाठी निवडला आहे.