राजगुरूनगर – खेड तालुक्यातील राक्षेवाडीत पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबातील चौघे बाधित झाले होते. त्यामुळे खेड तालुक्यात पाच करोनाबधित होते. मात्र, मंगळवारी (दि. 20) चाकण (ता. खेड) येथे करोनाबाधित रुग्ण आढळला असून त्याचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या लॅबला शासकीय परवानगी असून येथे करोना रुग्णाची शासकीय तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली. तसेच हा रुग्ण क्वॉरंटाइन असल्याने तो कोणाच्याही संपर्कात आला नसल्याची शक्यता आहे.
तरी प्रशासन खबरदारी घेत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरू जाऊ नये, असे आवाहन तेली यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.