मुंबई – मध्य रेल्वे लवकरच महाराष्ट्रातील आणखी चार स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’सुरू करणार आहे. (Central Railway to set up ‘Restaurant on Wheels’ at 4 more stations in Maharashtra) महाराष्ट्रात सध्या अशी दोन स्थानकांवर सोय करण्यात आली आहे.
मध्यरेल्वेने गेल्या वर्षी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असे एक रेस्टॉरंट उघडले आहे. आणि दुसरे एक नागपूर स्टेशनवर या वर्षाच्या सुरुवातीला उघडण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत आकुर्डी, चिंचवड, बारामती आणि मिरज (सांगली) स्थानकांवर लवकरच अशीच रेस्टॉरंट्स सुरू करण्यात येणार आहेत. “रेस्टॉरंट ऑन व्हील’ हा रेल्वेवर बसवण्यात येणारा एक सुधारित कोच आहे, त्यात एकाचवेळी चाळीस जणांना जेवण्याचा अनोखा आनंद घेता येतो.
Health Tips : ‘हे’ घरगुती अँटी एजिंग वापरून पन्नाशीतही दिसा तरुण !
या आधी कार्यरत असलेल्या मुंबईतील रेस्टॉरंट्स मध्ये सुमारे 1.25 लाख लोकांनी जेवणाचा आनंद घेतला आणि 1.50 लाख लोकांनी नागपुरातील आउटलेटला भेट दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर (मुंबईत), कल्याण (ठाणे), लोणावळा (पुणे), इगतपुरी (नाशिक), नेरळ आणि माथेरान (रायगड जिल्ह्या) अशा सात ठिकाणी पुढील काळात अशी रेस्टॉरंट सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.