रामनगर – कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यात कंचुगल बंदेमठात तेथील मठाचे प्रमुख संत मृतावस्थेत आढळून आले आहेत. छळवणूक आणि ब्लॅकमेल केले जात असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाउल उचलले असे त्यांनी लिहिलेल्या दोन पानी चिठ्ठीवरून सांगण्यात आले आहे.
बसवलिंगेश्वर स्वामी असे त्यांचे नाव असून ते मठाचे प्रमुख संत होते. 24 ऑक्टोबर रोजी मठाच्या पुजाघरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना मठातून हटवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू होता. त्यातूनच त्यांचा छळ केला जात होता व त्यांना ब्लॅकमेलह केले जात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. पोलीस पुढचा तपास करत आहेत.