नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांची तीन जणांनी मिळून गोळीबार करत हत्या केली. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. दरम्यान, या घटनेनंतर केंद्र सरकारने पत्रकारांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकार पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्यात आले. त्यावेळी ते हल्लेखोर पत्रकारांचे ओळखपत्र घालून आल्याचे निदर्शनास आले. यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात धोका निर्माण झाल्याने गृहमंत्रालयाने हे ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी सरकारकडून ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे.
The Ministry of Home Affairs will prepare SOPs for the safety and security of journalists. The step is being taken after three assailants posing as journalists killed gangster turned politician Atiq Ahmed and his brother Ashraf in UP’s Prayagraj last night while they were… pic.twitter.com/PPBbWbvfCR
— ANI (@ANI) April 16, 2023
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी गृह मंत्रालय एसओपी तयार करेल, असे या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गुंडांनी पत्रकारांच्या वेषात बनावट ओळखपत्र तयार करून अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पत्रकारांशी बोलत असताना हत्या झाल्याचा भ्रमनिर्माण करण्यात आल्याची माहिती कळते. त्यामुळे भविष्यात पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.