मुंबई – अनुराग कश्यपच्या केनेडी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात राहुल भट्टशिवाय सनी लिओनीचीही महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट आगामी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. कान महोत्सवात प्रदर्शित होणारा हा भारतातील एकमेव चित्रपट आहे. आता सनी लिओनीने या चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनबद्दल एक खुलासा केला आहे.
नवोदित कलाकाराला ऑडिशन द्यावं लागत हे सर्वांना माहिती आहे. मात्र बड्या स्टार्सना देखील अनेकदा आपल्या रोलसाठी लूक टेस्ट किंवा ऑडिशन द्यावं लागत असलयाचे यावेळी समोर आले आहे. सनी लिओनीने याबाबतचा खुलासा देखील केला आहे.
अनुराग कश्यपने सनी लिओनला केनेडीच्या ऑडिशनसाठी बोलावले होते, जेव्हा ती ऑडिशनसाठी पोहोचली तेव्हा अनुराग कश्यप व्यतिरिक्त प्रोडक्शन टीममधील 10 ते 12 लोक उपस्थित होते. यामध्ये बहुतेक जण टीम मेंबर्स होते. सनी म्हणते, तिथे पोहोचल्यानंतर मी खूप घाबरले आणि माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेले होते.
सनी लिओनीने संपूर्ण ऑडिशन प्रक्रिया आणि अनुभव तणावपूर्ण असल्याचे सांगितले. कुठल्यातरी मोठ्या परीक्षेला बसल्यासारखं वाटत असल्याचे देखील सनीने यावेळी सांगितले. ऑडिशन संपल्यानंतर, अनुराग कश्यपने सर्व टीम मेंबर्सना ऑडिशनबाबत त्यांचे मत विचारले.विशेष म्हणजे हे सर्व सनी लिओनी समोर घडत होत.
View this post on Instagram
केनेडी 2023 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहेत. यापूर्वी सनी लिओनीनेही खुलासा केला होता की, हे तिचे पहिले ऑडिशन नाही. याआधीही तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वेळा ऑडिशन दिले आहे पण हा तिचा आजपर्यंतचा सर्वात भयानक अनुभव आहे.मात्र ऑडिशन चांगलं झालं आणि अनुराग कश्यप तिच्यावर खुश देखील झाला.