सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आणि आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देश्याने सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद शिवाचार्यांविरोधात करण्यात आली होती.
अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी शिवाचार्यांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरच्या सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 467, 468, 471, 34 अन्वये जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह अक्कलकोट/उमरगा तहसील कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच खासदारकी धोक्यात आली असताना गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिवाचार्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.