सातारा – जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा शनिवारी सकाळी 74 वर पोहचला. सकाळी सातारा जिल्हा रुग्णालयात दोन तर कराड, फलटण व कोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा पाच संशयितांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कराड येथे काल शुक्रवारी रात्री उशिरा 14 जण पॉंझिटिव्ह आले होते. जिल्ह्यातील 64 संशयितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 15, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येथे पुणे कारागृहातून सातारा येथे प्रवास करुन आलेले 2, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 1 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात कराड येथून प्रवास करुन आलेला 1 अशा एकूण 19 जणांचे अहवाल कोविड-19 करोनाबाधित असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आता सातारा जिल्ह्यात 74 रुग्ण करोनाबाधित असून त्यापैकी आतापर्यंत 9 (कोविड 19) करोनामुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 60, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 97, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 31, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 12, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 8 व वाई येथील 1 असे एकूण 209 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाते 27 (आरोग्य कर्मचारी-12, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे 1, बाधित रुग्णांचा निकट सहवासातील 9, गरोदर माता 5), कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 4 (बाधिताच्या निकट सहवासातील 3, करोना बाधित रुग्णाचा चौदा दिवसानंतरचा नमुना 1), वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 74 (आरोग्य कर्मचारी 24, बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 35, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 1, गरोदर माता 12, प्रवास करुन आलेले 2), फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात 32 (आरोग्य कर्मचारी 1, बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 28, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 3) कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात 3 आरोग्य कर्मचारी, वाईच्या ग्रामीण रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 26 अशा एकूण 166 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.