व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत ना. शंभूराज देसाई यांचा सहभाग

सणबूर  – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे झाली. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला. त्यांनी वाशिम व सातारा जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला.

या बैठकीकरीता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत काही ठराविक मंत्री हे वर्षा निवासस्थान येथे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातील मंत्रीमंडळ कक्षात उपस्थित होते. मुंबई येथे उपस्थित नसणारे राज्याचे अनेक मंत्री यांनी त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणाहून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभाग नोंदविला.

तसेच ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या अडचणींचा आढावा मुख्यमंत्र्यांना दिला. ना. शंभूराज देसाई यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला. त्यांनी वाशिम व सातारा जिल्ह्यात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांची तपासणी करुन घेण्या संदर्भात रॅपिड टेस्ट कीट पुरविण्याबाबत तसेच बाहेर गावाहून वेळेवर देण्या संदर्भात लक्ष वेधले. तसेच वाशिम व सातारा जिल्हयातील करोनाचा आढावा मुख्यमंत्र्यांना दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.