#CAB : ‘हे सरकार भित्रे आहे, जनतेच्या आवाजाला घाबरते’

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात देशभरात हिंसक विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्यातच रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शने झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला.

प्रियंका गांधी म्हणाल्या कि, देशातील विश्वविद्यापीठांमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली जात आहे. ज्यावेळी नागरिकांची मागणी ऐकायला पाहिजे त्यावेळी भाजप सरकार उत्तर पूर्व, उत्तरप्रदेश, दिल्लीमध्ये विद्यार्थी आणि पत्रकारांवर दडपशाही करत आहे. हे सरकार भित्रे आहे, अशी टीका त्यांनी ट्विटमधून केली आहे.

तसेच हे सरकार जनतेच्या आवाजला घाबरते. या देशातील तरुण, त्यांचे साहस आणि त्यांच्या हिंमतीला घाबरते. मोदीजी ऐका हे भारतीय तरुण आहेत. हे दबणार नाहीत. त्यांचा आवाज तुम्हाला आज नाहीतर उद्या ऐकायलाच लागेल, असेही प्रियांका गांधी यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.