ग्वाँझू : चीनच्या ‘चेन यू फेइ’ हिने वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिचे या मोसमातील हे सातवे विजेतेपद ठरले.
https://twitter.com/olympicchannel/status/1206189998392958976?ref_src=twcamp%5Ecopy%7Ctwsrc%5Eandroid%7Ctwgr%5Ecopy%7Ctwcon%5E7090%7Ctwterm%5E3
महिला एकेरीत चीनच्या चेन यू फेइने चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगवर १२-२१, २१-१२, २१-१७ अशी मात केली. या विजयासह चेन यू फेइ ही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.
दरम्यान, याआधी या स्पर्धेतील दुस-या लढतीत चेन यू फेइने भारतीय बॅडमिंटनपटू सिंधूचा २०-१२, २१-१६, २१-१२ असा पराभव केला होता. त्यामुळे सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.