ग्वाँझू : जपानच्या केन्टो मोमोटा याने वर्ल्ड टूर फायनल्य बॅडमिंटन स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याचे या मोसमातील हे अकरावे जेतेपद ठरले आहे.
https://twitter.com/olympicchannel/status/1206130424239525888?ref_src=twcamp%5Ecopy%7Ctwsrc%5Eandroid%7Ctwgr%5Ecopy%7Ctwcon%5E7090%7Ctwterm%5E3
गतवर्षी केन्टोला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. स्पर्धेच्या अंतिम लढतीत केन्टो याने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसूका गिंटिंगवर १७-२१, २१-१७,२१-१४ अशी मात करत विजेतेपद पटकावले. ही लढत ८७ मिनिटे चालली.