लवकरात लवकर बस उपलब्ध करुन द्या; अडकलेल्या मजुरांची मागणी

बेल्हे:- वाशीम,परभणी,यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे २५० मजूर बेल्हे येथे अडकून पडले असून त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही सोय होत नसल्याने मजूर हताश झाले आहेत. बेल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८ मजूर रहात असून इतर मजूर शेतकऱ्यांच्या घरी रहात आहेत. या सर्वांना आप आपल्या गावी गायचं असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी वाहनांची मदत शासनाने लवकर करावी अशी मागणी या मजुरांनी व बेल्हे ग्रामस्थ दत्ता खोमणे यांनी केली आहे.

प्रशासनाने बस सेवा सुरु केल्या जाणार आहे. त्यात सगळ्या अडकलेल्यांना गावी परत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र रोज अनेक नव्या घोषणा होत आहे. आनलाईन फाॅर्म भरुन सुद्धा परवानगी मिळत नाही आहे. किंवा त्यावर  प्रतिक्रिया येत नाही आहे. त्यामुळे हे सगळे त्रस्त आहेत. गेले तीन दिवस झाले वेल्हे गावात ते बसची वाट बघत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.