भाजपने ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला

डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट फोफावत असताना विधानपरिषद निवडणुकांमुळे राजकारण देखील मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. भाजपमध्ये उमेदवारीवरून चांगलेच अंतर्गत वाद सुरु आहेत.  दरम्यान, भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना भाजपने उमेदवारी दिली.

भाजपने अजित गोपछडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे अर्ज ८ तारखेला दाखल केले होते. तसेच म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांना डमी अर्ज भरण्यास सांगितले . मात्र आता रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून भाजपने निवडले आहेत.

 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.