बर्लिन – जर्मनीतील प्रसिद्ध बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेफ्रीने सुरू असलेला फुटबॉल सामना एका संघातील मुस्लीम खेळाडूंना त्यांचा रोजा उपवास सोडण्यासाठी थांबवला. या रेफ्रींचे सध्या जगभरातून कौतुक होत आहे. तसेच स्पर्धेच्या आयोजकांनाही त्याचे समर्थन केले आहे.
सामन्यादरम्यान सूर्यास्त झाला व मुस्लीम खेळाडूंना रमजानचा उपवास सोडता यावा यासाठी थांबवण्यात आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला रमजान महिन्याची सुरुवात झाली. जर्मन बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धेतील मेन्झ आणि ऑग्सबर्ग यांच्यात झालेला सामना या खेळाडूंसाठी थांबवण्यात आला.
For the first time in history, a Bundesliga game was stopped for so that a Muslim player could break his fast during the match.
In the game between Augsburg and Mainz 05, the referee stopped the game at sunset so Moussa Niakhaté could take some fluids.
— HD Football (@hdfootballl) April 12, 2022
रेफ्री मॅटिअस जोलेनबेक यांनी सामन्याच्या 65 व्या मिनिटाला खेळ थांबवला. त्यामुळे मेन्झचा बचाव फळीतील खेळाडू मुसाला पाणी पिऊन आपला उपवास संपवता आला. मुसा आपला उपवास संपवल्यानंतर रेफ्रीजवळ गेला. त्याने रेफ्रीशी हस्तांदोलन केले आणि उपवास सोडण्यासाठी खेळ थांबवल्याचे आभार मानले.