ग्रामपंचायतींचे कारभारी संपात सहभागी : नागरिकांची कामे खोळंबली
शेलपिंपळगाव – राज्यातील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सोमवार पासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत आहेत. पुणे जिल्ह्यातील 1389 ग्रामपंचायतीनचे काम त्यामुळे ठप्प झाले आहे. यात खेड तालुक्यातील …ग्रामपंचायतींचे काम ठप्प झाले आहेत. या आंदोलनात खेड तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक यांच्यासह कर्मचार्यांच्या संघटना सहभागी झाल्या असल्याने तीन दिवसीय काम बंद आंदोलनाने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होणार आहे.
राज्यातील ग्रामसेवक सरपंच, उपसरपंच यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी सोमवारपासून तीन दिवस विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत असल्याने खेड तालुक्यातील… ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसत असून त्यांची विविध कामे पुढे ढकलावी लागत आहेत. सकाळी नागरिकांनी अर्ज आपापल्या कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, कार्यालय बंद असल्याने त्यांना परतावे लागले.
घराचे उतारे काढणे, पाणीपट्टी भरणे यासह अनेक प्रकारची कामे करता आली नाही. अनेक भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल झाले. ग्रामपंचायतीमधून नागरिकांना देण्यात येणारे सर्व दाखले कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबले आहेत. जिल्हा व तालुका स्तरावरील ग्रामसेवक, सरपंच व कर्मचार्यांच्या सर्व बैठका रद्द झाल्या आहेत. काम बंद असल्याने ग्रामसेवकांकडून दररोज जिल्हा परिषद व पंचायत समितीला देण्यात येणारा कामाचा अहवाल ही देण्यात येत नसल्याने वरिष्ठ अधिकार्यांसह नागरिकांची धावपळ होत आहे. दरम्यान, या संपातून काही कामे वगळली असली तरी काही ठिकाणी ती बंदच असल्याचे दिसून आले आहे.
सर्व ग्रामपंचायत तीन दिवस बंद असून ग्रामपंचायत सरपंच , कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांच्या विविध मागण्यांसाठी सरपंचांसह ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक आक्रमक झाले आहेत 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतीसह कर्मचार्यांनी काम बंद ठेवत आंदोलन करीत आहे. या राज्यव्यापी संपात अखिल भारतीय सरपंच परिषदेसह राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचार्यांचा सर्व संघटना आंदोलनात सहभागी झाले आहेत. तीन दिवस बंद नंतरही मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
– शशिकांत मोरे, उपाध्यक्ष, सरपंच परिषद
ही कामे बंद
* गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे बंद
* जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदी बंद
* सार्वजनिक स्वच्छता विभाग बंद
* सांडपाण्याची व्यवस्था पाहणारे कर्मचारी संपात सहभागी असल्याने ही यंत्रनाही बंद
* शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना बंद
* ग्रामपंचायत हद्दीतील येणारे कर संकलन बंद आहे
ही कामे सुरू
* ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पाणी पुरवठा सुरू आहे
* ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा सुरू आहे
* ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक दिवाबत्ती सुरू आहे
* शिक्षण विषयक सोयी सुविधा सुरू आहे
* ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व आत्यावश्यक सेवा सुरू आहे
* सिद्धेगव्हाण : येथील ग्रामपंचायत बंदच आहे.