नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुुधवारी अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी संसदेत पोहोचले. मात्र, 10 जनपथ सोडल्यानंतर काही अंतरावरच अचानक त्यांचा ताफा थांबला होता.
वास्तविक, वाटेत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपली कार थांबवली. कार थांबताच व्यक्तीच्या मदतीसाठी राहुल तत्परतेने स्वतः गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, राहुल गांधींचा ताफा जिथून जात होता तिथून एक स्कूटरस्वार रस्त्याच्या मधोमध पडलेला होता. त्यानंतर राहुल गांधी सुरक्षा रक्षकांसह कारमधून खाली उतरले. त्यांनी तेथे जाऊन जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती विचारताना दिसत आहेत.
त्यानंतर राहुल आपल्या कारकडे परतले आणि संसद भवनाकडे निघाले. राहुल गांधींच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. संसदेत पोहोचून राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.