Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा करू शकतात. याशिवाय, केंद्रीय कर्मचारी आणि मध्यमवर्गीयांसाठी करमाफीची घोषणा देखील शक्य आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मंत्रालयातून बाहेर पडल्याचे चित्र समोर आले आहे. यावेळी निर्मला सीतारमण यांच्या साडीचा रंग बदलला होता.
Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman along with Ministers of State Dr Bhagwat Kishanrao Karad and Pankaj Chaudhary and senior officials of the Ministry of Finance called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan before presenting the Union… pic.twitter.com/o2UrUCRuaH
— ANI (@ANI) February 1, 2024
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीचा रंग निळा होता, ज्यामध्ये पानांची सुंदर रचना करण्यात आली होती. मात्र, कापडी ब्रीफकेसचा रंग गेल्या वर्षीसारखा लाल आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राज्यमंत्री डॉ भागवत किशनराव कराड आणि पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या संपूर्ण टीमसोबत मंत्रालयाबाहेर दिसल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण आज सकाळी ११ वाजता संसदेत सुरू होणार आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीचा रंग लाल होता.