Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारान आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा करू शकतात. याशिवाय, केंद्रीय कर्मचारी आणि मध्यमवर्गीयांसाठी करमाफीची घोषणा देखील शक्य आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते, त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्ज इत्यादी दिले जातात.
त्यातीलच एक म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेचा पुढील हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. पीएम किसान योजना यापैकी सर्वात लोकप्रिय आहे, ज्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा पैसे दिले जातात, हा हप्ता प्रत्येक तिमाहीत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला जातो. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो, ज्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, यावेळी शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट मिळू शकते.
असे म्हटले जात आहे की, बजेटमध्ये सरकार पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा करू शकते. ते आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महिला शेतकऱ्यांसाठी ही रक्कम आणखी वाढू शकते आणि सरकार नवीन विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा देखील आणू शकते.
दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो, ज्याकडून देशातील सर्व स्तरातील लोकांना अनेक अपेक्षा असतात. यावेळी शेतकऱ्यांसाठीही अनेक प्रकारच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.