नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) हे मागील काही दिवसात महिला कुस्तीपटूंच्या लैगिंक छळाच्या आरोपामुळे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. दरम्यान, काही दिवस हे प्रकरण शांत होते मात्र आता पुन्हा एकदा कुस्तीपटूंच्या लैगिंक छळाचे प्रकरण न्यायालयात सुरू झाले आहे. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धक्कदायक वक्तव्य केले आहे.
राजधानी लखनौपासून जवळ असलेल्या बाराबंकी येथे एका कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी त्यांचं तिकीट कापणार असल्याच्या चर्चांवर त्यांना सवाल करण्यात आला. त्यावेळी त्यांनी धक्कादायक उत्तर देत,”‘माझं तिकीट कोण कापतंय… तुम्ही रद्द कराल का?’ असा प्रतिसवाल केला. त्यांच्या या उत्तरामुळे बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वासदेखील यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केला.
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh)बाराबंकी येथील केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये पोहोचले होते, तिथे माध्यमांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारले. सोशल मीडियावर चर्चा होत असल्याने तुमचे तिकीट कापले जात आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh)संतापले आणि माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे.