Entertainment News – अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि बॉलीवूड कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. नुकतेच परिणीतीने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमधील त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये परिणीतीने गोल्डन कलरचा लेहंगा परिधान केला होता आणि त्यावर सुंदर फिकट हिरव्या रंगाची ज्वेलरी घातली होती. तर राघवने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. या फोटोंमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत आहे. परिणीतीने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, “नाश्त्याच्या टेबलावर पहिली भेट झाली आणि पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झाले. खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. शेवटी मिस्टर आणि मिसेस झालो. एकमेकांशिवाय जगू शकत नव्हतो. आता आम्ही एकत्र नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.”
View this post on Instagram
परिणीती आणि राघव यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. या पोस्टनंतर राघव आणि परिणीतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, याआधी त्यांचा रिसेप्शनमधील एक फोटोही समोर आला होता. ज्यात दोघे सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये परिणीतीने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे आणि हातात त्याच रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. तर गळ्यात तिने एक मोठा नेकलेस घातला होता आणि या फोटोत तिच्या भांगेत कुंकू दिसत आहे. तर राघवने काळ्या रंगाचा सूट घातला होता.