लंडन – न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम याची इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने गुरुवारी केली. इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी बेन स्टोक्सची निवड केल्यानंतर आणखी एक धाडसी निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक म्हणून ब्रेंडन मॅक्युलम काम करत आहे. 40 वर्षीय मॅक्युलमने 2019मध्ये निवृत्त घेतली असून कसोटी संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची पहिल्यांदाच नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीनंतर मॅक्युलम म्हणाला, ही भूमिका स्वीकारताना मला सध्या संघासमोर असलेल्या आव्हानांची जाणीव असल्याचे त्याने सांगितले.
विशेष म्हणजे मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडची पहिली मालिका जूनमध्ये न्यूझिलंडविरुद्ध होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 2 जूनपासून लॉर्डस मैदानावर खेळला जाणार आहे. यापूर्वी इंग्लंडला शेवटच्या 17 कसोटींपैकी फक्त एका कसोटीत विजय मिळविला आहे. ज्यामध्ये त्यांना ऍशेसमध्ये 4-0 असा अपमानास्पद पराभव पत्कारावा लागला होता.