कार्यकारी संचालकपदी बाळासाहेब निर्वळ
टाकळी हाजी : शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी रमेश थोरात तसेच कार्यकारी संचालकपदी बाळासाहेब निर्वळ यांची संचालक मंडळाने निवड केली.
मावळते तज्ज्ञ संचालक रामदास उगले व कार्यकारी संचालक नवनाथ निचित यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर दोघांची निवड करण्यात आली. त्याबद्दल अखिल शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक नेते व जिल्हाध्यक्ष शिवाजीराव वाळके, राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साधना खोमणे, पतसंस्थेच्या उपसभापती शर्मिला निचीत, राज्य कार्यकारिणी सदस्या ललिता साकोरे,
जिल्हा सरचिटणीस सुरेश थोरात, तालुकाध्यक्ष अशोकराव पठारे व शिरूर नगरपालिका अध्यक्ष धनंजय जाधव, तालुका सरचिटणीस गणेश पवार, संचालक संदीप थोरात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
४५० कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या या नामांकित पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना चांगली सेवा देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. व संस्थेच्या नावलौकिकात वाढ करण्यात आपले मोलाचे योगदान आपल्या हातून घडो अशा भावना शिक्षक नेते शिवाजीराव वाळके यांनी व्यक्त केल्या व शुभेच्छा दिल्या.
माजी अध्यक्ष अर्जुन निचित, शिक्षक नेते सुभाष थोरात, सरचिटणीस चंद्रकांत दंडवते, नगरपालिका कार्याध्यक्षा संपदा राठोड, लिलाताई झांबरे, लक्ष्मण जगताप, भाऊसाहेब जाधव, संजय थोरात, अरुण खोमणे, महेश लहाने, ज्ञानदेव शिसोदे, सुभाष चव्हाण व अमोल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.