मुंबई – राज्यात अनेक मुद्द्यांवरून सध्या राजकीय खडाजंगी सुरू आहे. अशात शिवसेना आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वारंवार पाहायला मिळतात. यावरून मनसे नेते योगेश चिले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत हा चिरकूट माणूस आहे. त्यांना मुंगीही धमकी देणार नाही अशा शब्दात योगेश चिले यांनी राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा छेडल्यापासून राज्यभरातील सर्व मनसैनिक आक्रमक झाले असून मनसे आणि शिवसेना वाद सगळीकडे पाहायला मिळतो आहे. मनसेचे गजानन काळे यांनीही काल शिवसेनेला लक्ष्य केले होते.
उध्दव ठाकरेंच्या आगामी सभेसाठी जे पोस्टर तयार करण्यात आले त्यासाठी गर्दीचा जो फोटो वापरला होता, तो राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या गर्दीचा होता. ही चूक लक्षात आल्यानंतर ते डिलीट करण्यात आले होते. गर्दीसाठीही यांना राज यांचीच गरज भासते अशा आशयाची टिप्पणी काळे यांनी केली होती.
त्यानंतर संजय राऊत यांनी डिवचल्यावर आता योगेश चिले यांनी पुन्हा राऊतांना चिमटा काढला आहे. योगेश चिले यांनी ट्वीट करत राऊतांवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं की, राऊत यांना कोणी धमकी दयावी एवढही त्यांचे कर्तृत्व नाही.