पुणे – केंद्रीय विद्यालय जम्मु विभागाने आयोजित केलेल्या नॅशनल स्पोर्टस मीट महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्यातील केंद्रीय विद्यालयाला तब्बल 9 पदके मिळाली. या स्पर्धेत विविध गटात विद्यालयाच्या 14 मुली सहभागी झाल्या होत्या. त्यात 2 रजत तर 7 ब्रॉंझ अशी एकूण नऊ पदके प्राप्त केली.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक लक्ष्मण पवार, संजय भुकन यांनी या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य अविजित पांडा यांच्या हस्ते पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
पदक विजेते खेळाडू : मेघायंती नागमोडे रजत, हाबळे रजत, वि. श्रीनिद्धी सांची चव्हाण, प्रगती शर्मा, नव्या झा, जानवी राय व प्रिया भगत या सर्व ब्रॉंझपदक विजेते ठरल्या.