हांगझोऊ – भारताची स्टार महिला मुष्टियुद्धपटू लवलिना बोर्गोहेन हीने मंगळावारी आशियाई क्रीडा स्पर्धेत 75 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. या कामगिरीच्या जोरावर तीने किमान रजतपदक निश्चित करताना आगामी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटाही मिळवला.
गत ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलिनाने 75 किलो वजनी गटात थायलंडच्या मनिकोन बायसनचा 5-0 असा धुव्वा उडवला. लवलिनासह भारताची आणखी एक मुष्टीयुद्ध खेळाडू प्रिती पवार हीने 54 किलो वजनीगटात ब्रॉंझपदक पटकावले. तीला चीनच्या चॅंग युआनकडून 5-0 असा पराभव स्वीकारावा लागल्याने ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.
Lovely game by LOVLINA 💥🥊
🇮🇳’s Boxer @LovlinaBorgohai conquers her semifinal bout and marches into the 75kg FINAL 🤩🔥
Despite a tough match, our champ not only won the bout but also bagged the #Paris2024 Olympics quote in Boxing💯👍🏻
Many Congratulations!#Cheer4India… pic.twitter.com/Gzi9sXDPsN
— SAI Media (@Media_SAI) October 3, 2023
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज 10 वा दिवस आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी 15 आणि नवव्या दिवशी सात पदके मिळाली आहेत.