पुणे – अकोला येथे ८ ते १० मार्च दरम्यान झालेल्या सबजुनीयर गर्ल्स राज्यस्तरीय मुष्टीयुद्ध निवड चाचणीत जिया शेख हीने अफलातून कामगिरी केली व सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत एमआय बॉक्सिंग क्लबकडून जिया शेख सहभागी झाली होती. या स्पर्ध्येत जियाने तीन सामने खेळुन तिनही सामने विजयी होऊन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-where-is-kamran-khan-the-2009-ipl-star-who-could-bowl-140-kmph-deliveries/
तिच्या या कामगिरीमुळे तिची १८ मार्च पासुन नोएडा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिया ही माजी राष्ट्रीय मुष्टीयुद्ध खेळाडु लक्ष्मण पवार ह्यांच्याकडे सेवादान इंग्लिश मिडियम स्कूल येथे सराव करते.