#INDvAUS | ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली अल्टिमेट, आयसीसीकडून भारताचा गौरव

दुबई – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयी कामगिरी करणारा यंदाचा भारतीय क्रिकेट संघ सर्वात यशस्वी संघ ठरला असून या दोन संघात झालेली बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका आयसीसीने अल्टीमेट टेस्ट सीरिज म्हणून गौरवली आहे.

ऑनलाइन मतदान प्रक्रियेच्या आधारे ही निवड करण्यात आली. जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच आयसीसीने ही घोषणा केली. या पुरस्काराच्या निवडीसाठी जगभरात खेळल्या गेलेल्या एकूण 15 कसोटी मालिकांमधून आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मालिकेला अल्टीमेट मालिका म्हणून नावाजले आहे.

आयसीसीच्या संकेतस्थळावरही या मालिकेच्या संदर्भातील एक फोटोही पोस्ट केला गेला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्याच सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यातील एका डावात भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 36 धावांवर संपला होता.

यानंतर भारतीय संघातील नेक खेळाडूंना दुखापतीमुळे माघारही घ्यावी लागली होती. त्यातच नियमित कर्णधार विराट कोहलीही पॅटर्निटी रजा घेत मायदेशी परतला होता. त्याचवेळी बदली करणधार अजिंक्‍य रहाणेने अफलातून कामगिरीसह नेतृत्वातही चमक दाखवली व भारताने पराभवातून बाहेर येत अफलातून कामगरी केली. ब्रिस्बेन कसोटी जिंकत भारतीय संघाने मोठ्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ही मालिका भारताने 2-1 अशी जिंकली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.