Bollywood actor Govinda । बॉलिवूडमधील अभिनेता गोविंदा आता राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोविंदा या वर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी गोविंदाचे नाव चर्चेत आहे.
गोविंदा एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वी या अनुशंगानं अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती.
उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचं वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, या अनुशंगानं अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा आहे.
हे वाचले का ? ‘मफलरवाला आत गेला, गळ्यात पट्टा …’ भाजपने सांगितला पुढचा ‘नंबर’ कोणाचा?