Chandrashekhar Bawankule । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमक वाढताना दिसत आहे. कारण आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. त्यांनी उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता असल्याची घणाघाती टीका केलीय.
उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता Chandrashekhar Bawankule ।
आज भाजपच्या मुंबईतील मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी बावनकुळे यांनी बोलताना,”उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी भाषेत टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला. उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले.
पुढे बोलताना,”उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही. किंबहुना औरंगजेबी वृत्ती असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढले. त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केले. सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे. सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता मोदींना औरंगजेब म्हणत आहेत. उद्धव ठाकरे 22 जानेवारीची तारीख विसरले का? पण 4 जून येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. 2024 ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल, असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
ठाकरेंकडून मोदींना औरंगजेबाची उपमा Chandrashekhar Bawankule ।
गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला केला जात आहे. या दोन्ही नेत्यांकडून पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा केला जात आहे. ही गोष्ट भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. पंतप्रधान मोदी यांची वृत्ती औरंगजेबाची नाही, असे का म्हणायचे नाही? असे उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत म्हटले होते. त्याला आज भाजपकडून जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.