नगर -किरण काळे हे उत्तम वक्ते आहेत. चांगले संघटक आहेत. अभ्यासू युवा नेते म्हणून त्यांची नगर शहर आणि जिल्ह्याला ओळख आहे. त्यांनी राज्य पातळीवरती संघटना बांधण्याचे काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा निश्चितच कॉंग्रेस पक्षाला संघटना बळकट करण्यासाठी उपयोग होईल, असे प्रतिपादन नगर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केले आहे.
काळे यांची युवक कॉंग्रेस आणि एन.एस.यु.आय.च्या नगर शहर व जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल शहर युवक कॉंग्रेस आणि एन.एस.यु.आय. च्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी शहर युवक अध्यक्ष मयूर पाटोळे, एनएसयूआय अध्यक्ष दानिश शेख, पाथर्डी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, पाथर्डी अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहम्मद शेख आदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचलन अन्वर सय्यद यांनी केले. मुबीन शेख, डॉ. साहिल शेख आदींनी यावेळी आपले विचार मांडले. स्वप्नील पाठक, अहमद बागवान, योगेश काळे, राहुल भागवत, दीपक धाडगे, विलास भोसले, मोसिम शेख, प्रशांत पाटील, आसाराम पालवे, योगेश दिवाने, योगेश दळवी आदींसह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.