मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुणे, नाशिक, महाड आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
#WATCH | Maharashtra: A clash breaks out amid Shiv Sena workers, BJP workers and Police in Mumbai as Shiv Sena workers marched towards Union Minister Narayan Rane’s residence.
Union Minister Narayan Rane had given a statement against CM Uddhav Thackeray yesterday. pic.twitter.com/TezjDGGqAb
— ANI (@ANI) August 24, 2021
तर यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाच फोडले आहे. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे.
तर यातच नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला सिंहाच्या गुहेत येण्याची हिंमत करु नका अशा शब्दांमध्ये आव्हान दिलं होत.
काय आहे नितेश राणे
‘शिवसेनेच्या युवा सेनेने कार्यकर्त्यांना आमच्या मुंबईतील जुहूतील घराबाहेर गोळा होण्यास सांगितलं आहे. आमच्या घराजवळ जर का कोणीही जमा झाले तर त्यांना रोखण्याचे काम मुंबई पोलिसांनी करावे असे न झाल्यास जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल. सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत.
“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”
शिवसेना ‘ऍक्शन मोड’मध्ये! तुफान दगडफेक करत नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार
“नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत”; भाजपच्या ‘या’ आमदाराचे राणेंना समर्थन
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरबाजी
video – ‘…मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली