मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिवेसेनेने नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी सध्या हे बॅनर काढून टाकले आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.
Who will remove these banners ??😝 pic.twitter.com/EKcf7HptPa
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
ट्विटमध्ये नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘घर कोंबडा’ असा उल्लेख करणारा फोटो आपल्या ट्विटर शेअर केला आहे. तसेच यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले. नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असे सूचक विधान राणेंनी केले.