काश्मीरमध्ये भाजप सरपंचाची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

काश्मीरमध्ये भाजप सरपंचाची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

श्रीनगर – दक्षिण काश्मीरस्थित काजीगुंड येथे एका भाजप सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. सज्जाद अहमद खांडे असे भाजप सरपंचाचे नाव आहे. वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय कार्यकर्ते आणि पंचायत सदस्य सध्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. सज्जाद अहमद खांडे यांना कुलगामच्या काजीगुंड येथिल निवास्थानाजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. सज्जाद खांडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्षही होते. अनेक भाजप नेत्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, कुलगाममध्येच अन्य सरपंच  आरिफ अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर मागील महिन्यात भाजपचे शेख वसीम बारी, त्यांचे वडील आणि भाऊ यांची बांदीपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.