Manoj Jarange Beed loksabha : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद आज विधानसभेत देखील उमटल्याचे पाहायला मिळाले.त्यानंतर जरांगे यांची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. अशात आता मनोज जरांगे हे महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेचे उमेदवार असतील असा दावा भाजप नेत्याने केल्याने आहे.
मनोज जरांगे यांना त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठा समाजाने पाठींबा दिला होता. मात्र सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन वेगळं अधिवेशन जाहीर केला यानंतर जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. अशात जरांगे यांच्यावर बावसकर महाराज यांनी देखील आरोप करत ते पॉलिटिकल भाषा बोलत असल्याचे म्हंटले. | Manoj Jarange Beed loksabha
अशात आता भाजप नेत्याने केलेल्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. “बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे” असा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. | Manoj Jarange Beed loksabha
देशमुख म्हणाले,”जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं” तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असा दावाही देशमुख यांनी केला.
राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोपही आशिष देशमुख यांनी यावेळी केला आहे. | Manoj Jarange Beed loksabha
SIT चौकशीवर जरांगे म्हणतात..
“देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचं नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फोन कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Maharashtra Budget 2024 : राज्याची 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु – अजित पवार
Maharashtra Budget 2024 : अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार; अजित पवारांची मोठी घोषणा